नवी दिल्ली, 27 जून: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत आहे. अशातच देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. दिवसेंदिवस विक्रमी लसीकरणाची (Corona Vaccination) नोंद देशात होत आहे. शनिवारी कोरोना लसीकरण करण्यात भारतानं आणखी एक कामगिरी केली आहे. देशात आतापर्यंत 32 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झालं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं (Health Minister) दिली आहे. संध्याकाळी 7 पर्यंत ही संख्या 32.11 कोटींवर गेली. जगात यापेक्षा जास्त डोस केवळ चीन आणि अमेरिका या देशातच देण्यात आलेत. Ourworldindata.org च्या मते, चीनमध्ये आतापर्यंत 1 अब्जपेक्षा जास्त लसीकरण झालं आहे. दरम्यान चीननं जाहीर केलेला डेटा नेहमीच संशयास्पद असतो. तर अमेरिकेत 32 कोटी कोरोनाचे डोस देण्यात आलेत. हेही वाचा- राज्यातल्या 21 डेल्टा + व्हेरिएंटच्या रुग्णांचं लसीकरण झालं?, मोठी माहिती उघड केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी 7 पर्यंत 58.10 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. कोव्हिन अॅपनुसार रात्री 11 वाजेपर्यंत ही संख्या 63.84 लाखांवर पोहोचली होती. गेल्या 4 दिवसांपासून ही संख्या सतत 60 लाखांहून अधिक राहिली आहे. मध्य प्रदेशात सर्वात जास्त लसीकरण शनिवारी लसीकरणात मध्य प्रदेशने पुन्हा देशात अव्वल स्थान मिळवले. येथे 9.92 लाखांहून अधिक लोकांना लस घेतली. यासह राज्यात लसींची संख्या जवळपास 2 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. यापूर्वी 21 जून रोजी विक्रमी 17.42 लाख लोकांनी आणि 23 जून रोजी 11.59 लाख लोकांना लस दिली गेली. मध्य प्रदेशनंतर सर्वात जास्त लस महाराष्ट्रात देण्यात आल्यात. महाराष्ट्राचा आकडा 7.34 लाख आणि उत्तर प्रदेशमध्ये 5.45 लाख इतका आहे. गुजरात आणि तामिळनाडूमध्ये ही संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये सुमारे 2 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली.