JOIN US
मराठी बातम्या / देश / COVID-19: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, केली ही विनंती

COVID-19: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, केली ही विनंती

या आधीही केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus in India) आलेख घसरणीला लागला आहे.

जाहिरात

Garwah: Union Minister for Textile and Minister of Women & Child Development Smriti Zubin Irani addresses an election rally for the forthcoming Assembly Election-2019 in Garwah district, Jharkhand, Sunday, Nov. 24, 2019. (PTI Photo)(PTI11_24_2019_000156B)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली. माझी चाचणी पॉझिट आली आहे. जे माझ्या संपर्कात आले त्या सगळ्यांनीही टेस्ट करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या आधीही केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक मंत्री उपचारानंतर पुन्हा कामालाही लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus in India) आलेख घसरणीला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा (Maharashtra) धोका मात्र पुन्हा वाढला आहे. सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 48.57 प्रकरणं फक्त महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात आहेत.  24 तासांत कोव्हिड 19 मुळे मृत्यू झालेली 58 टक्के प्रकरणं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकातील आहेत. या कालावधीतील कोरोनाची 49.4 टक्के नवीन प्रकरणं  केरळ (4,287), पश्चिम बंगाल (4,121), महाराष्ट्र (3,645), कर्नाटक (3,130) आणि दिल्लीतील (2,832) होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या