विपिन आणि ललित दोन्ही भाव फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला.
कोरोनाच्या महासंकटात लॉकडाऊन आणि या आजारामुळे अनेक जण बेरोजगार झाले. कोरोनाचं थैमान सुरूच आहे मात्र पोटापाण्यासाठी काहीतरी कमवणं भाग असलेल्या दोन भावांची खास कहाणी आज आपण पाहणार आहोत.
फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या भावाची नोकरी कोरोनाच्या महासंकटामुळे गेली. अशावेळी घरात रोजगार आणायचा कसा हा प्रश्न पडला असतानाचा दोन भावांनी रोजगार शोधून काढला आहे.
हिमाचल प्रदेशातील हमीनपुरा इथे राहणाऱ्या या दोन भावांनी मातीचा ओव्हन तयार केला आहे. या ओव्हनमध्ये ते पिझ्झा तयार करून विकतात आणि त्यातून येणाऱ्या पैशांमधून उदर्निवाह चालतो.
20 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या छोट्या व्यवसायाला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. साधारण दिवसाला 125 ते 150 पिझ्झा तयार करून हे दोन भाव विकत आहेत. पिझ्झासाठी लागणार साहित्य सॉस सर्व ते स्वत:तयार करतात त्यामुळे त्यांच्या पिझ्झाला खूप मागणीही आहे.
गावात तयार होणाऱ्या भाज्यांचा वापर पिझ्झा तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय त्यांनी स्वत: माहितीचा ओव्हन दगड, मातीच्या सहाय्यानं डिझाइन करून बांधला आहे. लागणारं साहित्य हे जवळच्या गावांमधून मागवलं जातं. तर सॉस आणि तर गोष्टी घरी तयार करत असल्याचं या दोन्ही भावांनी सांगितलं.
विपिन आणि ललित दोन्ही भाव फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं अनोखा पिझ्झा तयार करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस हा पिझ्झा अधिक प्रसिद्ध होत असल्यानं नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत.