JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / कोरोना पाठोपाठ भारतावर 2 आठवड्यात आणखी एक संकट, आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून अलर्ट

कोरोना पाठोपाठ भारतावर 2 आठवड्यात आणखी एक संकट, आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून अलर्ट

संयुक्त राष्ट्रातील एका मोठ्या एजन्सीनं या संदर्भात भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.

0108

कोरोना, भारत-चीन सीमेवरील तणाव आणि काश्मीरमधील दहशतवादासोबतच आता आणखी एक संकट भारतावर येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील एका मोठ्या एजन्सीनं या संदर्भात भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.

जाहिरात
0208

पुढच्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा भारतावर टोळधाडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊ शकतं. टोळधाड ही समस्या अद्याप पूर्णपणे गेली नसून आता पुन्हा एकदा भारतावर हे संकट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
0308

पश्चिमेकडून हजार किलोमीटर दूरवरून हा टोळधाडीचा हल्ला सुरू झाला आहे. याआधीही राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

जाहिरात
0408

संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशननं या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. ही टोळधाड या आठवड्यात पाकिस्तानच्या सीमेवर तर पुढच्या दोन आठवड्यात भारतावर हल्लाच्या तयारीत आहे.

जाहिरात
0508

FAO ने दिलेल्या माहितीनुसार टोळधाड राजस्थानकडून येण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

जाहिरात
0608

मान्सूनचा काळ हा टोळांच्या प्रजननासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात टोळांचं प्रजनन झालं तर धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जाहिरात
0708

या वर्षी पहिल्यांदाच भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात टोळधाड झाली. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

जाहिरात
0808

आता पुन्हा एकदा टोळधाड येण्याबाबत इशारा दिल्यानं शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या