JOIN US
मराठी बातम्या / देश / Reliance AGM 2022: Jio 5G बद्दल चेअरमन आणि MD मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Reliance AGM 2022: Jio 5G बद्दल चेअरमन आणि MD मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सोमवारी (29 ऑगस्ट 22) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries Ltd) वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) म्हणाले…

जाहिरात

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, दिवाळीपूर्वी 5G नेटवर्कही होणार सुरु : मुकेश अंबानी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट:  रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सोमवारी (29 ऑगस्ट 22) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries Ltd) वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) म्हणाले, “डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील अधिकाधिक शेअर होल्डर्स एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. खरं तर मला प्रत्यक्ष बैठकीतील आपल्या व्यक्तिगत गप्पा आणि सद्भावाचं वातावरण आठवतं. मला असा पूर्ण विश्वास आहे की, पुढच्यावर्षी आपण अशा हायब्रीड मोडवर स्वीच होण्यासाठी सक्षम असू ज्यात प्रत्यक्ष आणि डिजिटल या दोन्ही पद्धतींचं योग्य समायोजन केलं गेलं असेल.’ रोजगार देण्याबाबत ते म्हणाले, “रिलायन्सने रोजगार उत्पन्न करण्यात एक विक्रम केला आहे. आपल्या सगळ्या प्रकारच्या व्यवसायांत मिळून कंपनीने 2.32 लाख नोकऱ्या दिल्या आहेत. रिलायन्स रिटेल आता भारतातली सगळ्यांत मोठी नोकऱ्या देणारी कंपनी झाली आहे.” Jio 5G 100 मिलियन घरांना जोडेल मुकेश अंबानी म्हणाले की, Jio 5G 10 कोटींहून अधिक घरांना “अद्वितीय डिजिटल अनुभव आणि स्मार्ट होम सोल्युशन्स” च्य माध्यमातून जोडणार आहे. “ आम्ही लाखो लहान व्यापारी आणि लहान व्यवसायांना उद्योगाबाबत खूप उंचीवर पोहोचवणार आहोत.आम्ही त्यांना क्लाउड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक, प्लग-अँड-प्ले सुविधा पुरवून आम्ही बलवान करणार आहोत .” येती 25 वर्षं महत्त्वाची या आधी मुकेश अंबानींनी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात ‘पंच-प्रण’ या पाच आवश्यकतांबद्दल मत मांडलं होतं, ज्यामुळे 2047 पर्यंत आपला भारत एक विकसित राष्ट्र होऊ शकेल.” ते पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या पिढ्यांनी सामूहिक स्वरूपात काम करून आतापर्यंत जे काही मिळवलं आणि उभारलं आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्यासाठी भारतीयांची पुढची पिढी सज्ज आहे आणि रिलायन्स भारताच्या समृद्धी व प्रगतीमध्ये पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक योगदान द्यायला तयार आहे. रिलायन्सचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 47% नी वाढला मुकेश अंबानी म्हणाले, “आपली कंपनी वार्षिक महसूलात100 अरब डॉलरच्या पलीकडे जाणारी भारतातली पहिली कॉर्पोरेट कंपनी झाली आहे. रिलायन्सचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 47% वाढून 7.93 लाख कोटी रुपये किंवा 104.6 अरब डॉलर झाला आहे. रिलायन्सच्या वार्षिक कन्सॉलिडेटेडने EBITDA 1.25 लाख कोटीचा महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केला आहे.” ही रिलायन्स इंडस्ट्रीजची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. गेल्या वर्षी (2021) मध्ये झालेल्या AGM मध्ये कंपनीने ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये प्रवेश करत असल्याची मोठी घोषणा केली होती, तसंच 2020 च्या एजीएममध्ये कंपनीने गूगल या जगविख्यात कंपनीने रिलायन्स कंपनीत गुंतवणूक केल्याची बातमी जाहीर करण्यात आली होती. Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या