JOIN US
मराठी बातम्या / देश / CBSE 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला, जाणून घ्या नवा फॉर्म्यूला

CBSE 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला, जाणून घ्या नवा फॉर्म्यूला

सीबीएसई (CBSE Evaluation 2021) 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला आहे. जाणून घ्या कसा असेल निकालाचा फॉर्म्यूला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जून: सीबीएसई (CBSE Evaluation 2021) 12 वी निकाल प्रकरणी नियुक्त केलेली 13 सदस्यीय समितीनं गुरुवारी सुप्रीम कोर्टाला ( Supreme Court) आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. सादर केलेल्या अहवालानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाचा बाजूनं आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज दिले जाईल. इयत्ता 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल, हे सूत्र निकालाचे असणार आहे. सीबीएसईने स्पष्ट केलं की, बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसंच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.

संबंधित बातम्या

31 जुलैला निकाल जाहीर होईल. तसंच दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, त्याचप्रमाणे अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुणे घेतले जाईल. दहावीचे 30% गुण, अकरावीच्या गुणातील 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या