बिहार, 20 मे: चारा घोटाळा प्रकरणात नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री (Former Bihar Chief Minister) आणि राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय (CBI) त्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयचे पथक माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या पाटणा येथील निवासस्थानीही पोहोचले आहे. सीबीआयचे पथक बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या 10 सर्कुलर रोड येथील निवासस्थानी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, RRB मध्ये लालूंच्या कार्यकाळात झालेल्या गोंधळाबाबत सीबीआयने छापा टाकला आहे. देशात 15 ठिकाणी छापा टाकल्याची बातमी आहे. राबडी देवी आणि त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव पाटणा येथील 10 सर्कुलर रोड येथील निवासस्थानी उपस्थित आहेत. Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज प्रताप आणि राबडी देवी या दोघांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा, गोपालगंज, दिल्लीसह लालू यादव आणि राबडी देवीच्या 16 ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांना स्वस्त दरात जमीन मिळाली. सीबीआयला संशय आहे की या प्रकरणात जमीन खरेदीच्या बदल्यात पैसेही दिले गेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयची टीम दिल्ली आणि बिहारमध्ये एकूण 17 ठिकाणी छापे टाकत आहे. मात्र, सीबीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लालूंची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची नुकतीच जामिनावर तुरुंगातून सुटका झाली. लालू यादव सध्या दिल्लीत मुलगी मीसा भारतीच्या घरी राहत आहेत. त्याचवेळी राबडी देवी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. सीबीआयच्या छाप्यानंतर लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी वाढू शकतात, असे मानले जात आहे. सध्या लालू यादव यांचे धाकटे पुत्र आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे पत्नी रेचेलसोबत एका सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला गेले आहेत.