नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : देशात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढू लागली असताना आता डेंग्यूच्या (Dengue) विषाणूनंही डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. बंगालपासून (West Bengal) उत्तर प्रदेशपर्यंत (Uttar Pradesh) अनेक राज्यांमध्ये डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरनं (Viral Fever) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सर्वाधिक चिंतेची गोष्ट ही की डेंग्यू आणि व्हायरल तापाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा लहान मुलांवर होऊ लागला आहे. आतापर्यंत विविध राज्यांतील आकडेवारी पाहता, बाधित होणाऱ्या लहान मुलांचं प्रमाण सगळीकडेच अधिक आहे. या राज्यांमध्ये कहर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये डेंग्यू आणि व्हायरल तापाने सर्वाधिक नुकसान केलं आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून आतापर्यंत शून्य ते पाच वयोगटातील 10, तर पाच ते दहा वयोगटातील 10 मुले दगावली आहेत. त्याचप्रमाणं 1 पुरुष आणि 6 महिलांचाही तापानं बळी घेतला आहे. फिरोजाबादमध्ये वाढले रुग्ण उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून मेरठ आणि गाझियाबादवरून डॉक्टरांच्या विशेष पथकाला तिथे पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फिरोजाबाद भेटीनंतर तिथल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये अज्ञात ताप पश्चिम बंगालमध्ये तर एका अज्ञात तापाने सध्या सर्वांना हैराण केलं आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सध्या 94 मुलांवर उपचार सुरु आहेत. हळूहळू काही मुले बरी होत असून ती घरी जात असल्याचं चित्र असलं तरी तेवढ्यात प्रमाणात नवे रुग्णही दाखल होत आहेत. हरियाणात तापामुळे मृत्यू हरियाणातील पलवल जिल्ह्यात तापामुळे सहा जणांचा जीव गेला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात तापामुळे हे मृत्यू झाले असून कोरोना किंवा डेंग्यू या दोन्हीपेक्षा वेगळीच लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. हे वाचा - नगरमध्ये ATM क्लोन करून लाखोंचा गंडा; 8वी पास बहाद्दर निघाला मास्टरमांइड बिहारमध्ये डेंग्यू बिहारमध्ये डेंग्यूच्या 10 केसेस आतापर्यंत आढळल्याची माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे. जनता दरबार कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे