JOIN US
मराठी बातम्या / देश / BREAKING रामविलास पासवान यांचं निधन! बिहारच्या राजकारणाला मोठा धक्का

BREAKING रामविलास पासवान यांचं निधन! बिहारच्या राजकारणाला मोठा धक्का

‘पापा अब इस दुनिया मे नहीं है’ रामविलास पासवान यांच्या मुलानेच दिली वडिलांबद्दल धक्कादायक बातमी.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 8 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) नेते चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चिराग यांनी स्वतः Tweet करून ही माहिती दिली. 3 ऑक्टोबरला पासवान यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात होते. दिल्लीच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रात Consumer Affairs खात्याचे मंत्री असणारे पासवान 74 वर्षांचे होते. बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 23 ऑगस्टला दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये पासवान यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

‘पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।’ असं भावुक Tweet करत चिराग पासवान यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा पासवान यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा असणारे रामविलास पासवान यांनी 6 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं होतं.  बिहारच्या राजकारणात यापूर्वीही किंगमेकरची भूमिका निभावली होती. आता 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही बिहारचा मुख्यमंत्री पासवान ठरवणार का अशी चर्चा सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी आली आहे. पासवान यांनी अनेक वेळा केंद्रिय मंत्रिमंडळात खातं सांभाळलं होतं. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, एच.डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये पासवान मंत्रिपदी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या