मध्यप्रदेश, 24 ऑक्टोबर : सत्ता टिकवायची असेल तर मतांचा राजकारण केलं जातं आणि त्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटेत ते करण्याची अनेक नेत्यांची तयारी असते. याबाबत अनेक बातम्या आपण वारंवार ऐकत वा वाचत असतो. यामध्ये आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मंत्री मतांसाठी एका काँग्रेस कार्यकर्त्यासमोर विनवणी करीत आहे. मात्र यानंतरही काँग्रेस कार्यकर्ता मंत्र्यांनी दिलेलं प्रपोजल घेण्यास तयार नाही. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्वालिअरमध्ये काँग्रेस पार्टी बदलून भाजपमध्ये गेलेल्या प्रद्र्युम्न सिंह तोमर हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते आपल्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यासमोर मतांसाठी विनवणी करीत आहे. ते वारंवार त्याला विनंती करीत आहे. इतकं की शेवटी मंत्र्यांनी गुडघे टेकून त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते अरुण यादव यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, पाहा कसं एका लाचार मंत्र्यांने काँग्रेसच्या टिकाऊ कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकले. काँग्रेसचे काही नेते बिकाऊ असू शकतात, मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता टिकाऊ आहे.
प्रद्मुम्न सिंह तोमर हे भाजपमधील दिग्गज मंत्री असून ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत. भादपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते वारंवार काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधत असतात. त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. ते काँग्रेस नेत्याच्या पायावर डोकं ठेवायचाही प्रयत्न करीत आहे.