JOIN US
मराठी बातम्या / देश / बिहारमध्ये नाराजी नाट्य? उपमुख्यमंत्रिपदावरून सस्पेंस कायम; या दोन नेत्यांची नावं चर्चेत

बिहारमध्ये नाराजी नाट्य? उपमुख्यमंत्रिपदावरून सस्पेंस कायम; या दोन नेत्यांची नावं चर्चेत

भाजपचे तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणु देवी (Ranu Devi) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 15 नोव्हेंबर: बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची सोमवारी शपथ घेणार (CM Nitish Kumar) आहेत. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. तर भाजपमध्ये नाराजी नाट्याला सुरूवात झाल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जे ट्विट केलं त्यावरून ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. कार्यकर्ता हे पद आपल्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर राजनाथ सिंग आणि नितीश कुमारांनी कुठलंही स्पष्ट उत्तर दिलं नसल्याने सस्पेंस वाढला आहे. भाजपचे तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणु देवी (Ranu Devi) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पक्ष जी जबाबदारी देईल तो योग्य पद्धतीने पार पाडणार असल्याचा विश्वास किशोर यांनी व्यक्त केला. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी तार किशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली. मोदी यांनीच त्यांचं नाव सुचवलं. तर उपनेतेपदी नाम रेणु देवी यांची निवड करण्यात आली. भाजपच्या बैठकीत सुशील कुमार मोदी यांनी दिलेलं भाषण हे निरोपाचं भाषण दिल्यासारखं होतं असं म्हटलं जात आहे. भाजप आणि संघ परिवाराने मला खूप काही दिलं. एवढं कदाचित कुणालाच मिळालं नसेल. या पुढे जी जबाबदारी दिली जाईल त्याचं मी पालन करणार आहे. कार्यकर्ता हे पद माझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार पुन्हा (Nitish Kumar) एकदा शपध घेणार आहेत. उद्या सोमवारी (16 नोव्हेंबर)ला शपधविधी होणार आहे. त्याआधी नितीश कुमारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एनडीएच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले, यावेळी माझी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची इच्छा नव्हती. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटत होतं, मात्र भाजप नेत्यांच्या आग्रहानंतर मी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत (NDA Meeting) त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आली. त्यानंतर नितीश कुमार यांनी घटपक्षांच्या नेत्यांसह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या आहेत. भाजपने 110 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यात 74 जागा त्यांना मिळाल्या होत्या. तर जेडीयूला मागच्यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या.

जेडीयूची कामगिरी निराशाजनक राहिली तरीही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली. भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या