JOIN US
मराठी बातम्या / देश / Bihar Election: अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

Bihar Election: अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

आरजेडीने खुल्या मनाना पराभव स्वीकारावा असं आवाहनही भाजपने केलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी आणि सर्व नेत्यांनी आपल्या यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं असा दाव भाजपने केला आहे. रात्री 11.15 वाजता भाजपने पत्रकार परिषद घेऊन बहुमताचा दावा केलाय. रात्री उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार NDAने बहुमतासाठी 123 जागा जिंकल्या होत्या. तर आणखी 2 जागावर NDAला आघाडी आहे. तर महाआघाडीची गाडी 110वर थांबला आहे. नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केलाय. आरजेडीने खुल्या मनाना पराभव स्वीकारावा असं आवाहनही भाजपने केलं आहे. सुशील कुमार मोदी यांनी आणि सर्व नेत्यांनी आपल्या यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. निवडणूक आयोगाने मात्र अनेक जागांची औपचरिक घोषणा  रात्री उशीरापर्यंत केलेली नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या विजयाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहे. जनतेने खोट्या आश्वासनांना नाकारलं असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं आहे.

खासदार असदुद्दीन ओवैसी याचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) हा ‘वोट कटवा’ आहे, अशा शब्दांत अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. एवढंच नाही तर AIMIM ही भाजपचा (BJP) मित्र पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व सेक्युलर पक्षांनी ‘वोट कटवा’ ओवैसी यांच्यापासून सावध राहायला हवं, असं देखील अधीर रंजन चौधरी यांनी सल्ला दिला आहे. बिहार निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा भाजपनं स्वत: च्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, अशी टीका देखील अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या