JOIN US
मराठी बातम्या / देश / हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांच्या स्टॉलला बंदी, हिजाबनंतर नवा वाद

हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांच्या स्टॉलला बंदी, हिजाबनंतर नवा वाद

महालिंगेश्वर मंदिरात 20 एप्रिलपासून वार्षिक जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या जत्रेत उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्ससाठी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नवी दिल्ली, 23 मार्च : गेले काही महिने कर्नाटकमधील हिजाब (Hijab) प्रकरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) या संदर्भातील याचिकांवर निकाल देताना हिजाब ही अनिवार्य धार्मिक प्रथा नसल्याचा निकाल दिला होता. कोर्टाच्या या निकालाचा अनेक राजकीय नेते आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. काही शाळांनी हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यानं विद्यार्थिनींनी परीक्षांवरदेखील बहिष्कार टाकला होता.

दरम्यान, तेथील हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) या दोन समुदायातील तणाव वाढत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर काही बॅनर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये हिंदू मंदिरांच्या परिसरात भरणाऱ्या जत्रेत मुस्लिमांना स्टॉल लावता येणार नाही, असं म्हटलंय.

पुत्तूर तालुक्यातील महालिंगेश्वर मंदिरात 20 एप्रिलपासून वार्षिक जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या जत्रेत उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्ससाठी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये केवळ हिंदूंनाच स्टॉलसाठी बोली लावण्याची परवानगी आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उजव्या विचारसरणीच्या गटांनी ही मागणी केली होती, त्यानंतर मंदिर समित्यांवर दबाव आला. हिजाबच्या निर्णयानंतर मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली आणि आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे मंदिरांनी त्यांना वार्षिक जत्रेत स्टॉल लावू देऊ नयेत, असं उजव्या विचारसरणीच्या गटांचं म्हणणं आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिलंय. केवळ पुत्तूर तालुक्यातच नाही तर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बाप्पांडुई श्री दुर्गापामेश्वरी मंदिरातही असेच पोस्टर पाहायला मिळाले. कायद्याचा आदर न करणाऱ्या आणि एकतेच्या विरोधात असणाऱ्या लोकांना इथं व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं पोस्टरमध्ये लिहिलं होतं. ज्या गायींची आम्ही पूजा करतो, त्या गायींना ते मारतात. आता हिंदू जागृत झाले आहेत, त्यामुळे या लोकांना इथं स्टॉल लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. असं पोस्टरमध्ये म्हटलंय. काही दिवसांनी श्री दुर्गापामेश्वरी मंदिर परिसरात वार्षिक उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु तिथं मुस्लिम लोकांना व्यवसाय करता येणार नाही.

हे वाचा -  देशात याठिकाणी होणार जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराची निर्मिती; मुस्लीम व्यक्तीने दान केली कोट्यवधींची जमीन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या (Congress Leader Siddaramaiah) यांनी हे प्रकरण निषेधार्ह असल्याचं म्हटलंय. तसंच संविधानविरोधी कृत्य करणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करायली हवी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी सांगितलं. कोणत्याही सामाजिक संस्थेनं याविरोधात तक्रार केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू. तसंच काही दिवसांनी तहसिलदार त्या परिसराचा दौरा करून याबाबत सविस्तर रिपोर्ट तयार करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या