JOIN US
मराठी बातम्या / देश / सकाळी-सकाळी 'शिव-पार्वती'ला भांडताना पाहून लोक संतापले, थेट पोलीस ठाण्यातच खेचलं

सकाळी-सकाळी 'शिव-पार्वती'ला भांडताना पाहून लोक संतापले, थेट पोलीस ठाण्यातच खेचलं

जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिसपुर, 10 जुलै : फिल्ममेकर लीना मणिकेलाई यांचा माहितीपट कालीच्या पोस्टवरील वादात आसाममधील (Assam News) एका तरुण-तरुणीला शिव-पार्वतीच्या वेशात भांडण करणं महागात पडलं आहे. हिंदूवादी संघटनांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शिवाच्या रुपात असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर जामीनावर त्याला सोडण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला जामीनावर सोडण्यात आलं आहे. त्याला नोटीसही देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिव-पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या तरुण-तरुणींनी सांगितलं की, ते कलाकार आहेत. आणि सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे क्रिएटिव्ह नाटक केलं होतं. सकाळी-सकाळी शिव-पार्व.ती होऊन रस्त्यात भांडण… शनिवारी सकाळी साधारण 8.30 वाजता ‘भगवान शिव’ हे आसाममधील नागांव शहरातील रस्त्यांवर ‘देवी पार्वती’ यांच्यासह रॉयल एनफिल्ड बुलेटवर दिसले. दोघे शिव-पार्वतीच्या वेशभूषेत बुलेटवरुन प्रवास करीत होते. तेव्हा अचानक त्यांच्या बुलेटमधील पेट्रोल संपलं. यावरुन पार्वतींची वेशभूषा केलेली तरुणी नाराज झाले. तिने भगवान शिवासोबत भांडण सुरू केलं. भगवान शिवच्या वेशात असलेल्या तरुणानेही प्रत्युत्तर दिलं. असं करत दोघांमधील भांडण देशातील वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीवरुन महागाईपर्यंत पोहोचलं. शिव-पार्वतीला असं भररस्त्यात भांडण करताना पाहून काही लोक संतापले. ही बातमी हिंदू संघटनेपर्यंत पोहोचली. त्यांनी देवी-देवतांचा अपमान केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार केली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी शिव-पार्वतीच्या वेशात असलेल्या तरुणाला ताब्यात घेतलं.

संबंधित बातम्या

लोकांमध्ये जागरुकता आणण्याचा प्रयत्न… शिव झालेल्या तरुणाने सांगितलं की, तो अभिनेता आहे. त्याचं नाव ब्रिनिचा बोरा आहे. पार्वती झालेल्या तरुणीचं नाव परिस्मिता दास आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रचनात्मक विरोध करून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे नाटक केलं होतं. अनेक लोक आपल्या अडचणी दूर करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करतात. यासाठी आम्ही शिव-पार्वतीचा वेश घेण्याचं ठरवलं. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी रॅलींचं आयोजन केलं जातं. मात्र यासाठी खूप खर्च होतो. मात्र तरीही लोक त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह कल्पना राबवण्याचं ठरवलं. मात्र हिंदू संघटनेला त्यांची ही भूमिका पटली नाही. आणि तरीही त्यांनी पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या