JOIN US
मराठी बातम्या / देश / अरे देवा! WhatsApp वर फोटो पाहून पसंत केला नवरा, लग्न मंडपात चेहरा पाहताच नवराई पसार

अरे देवा! WhatsApp वर फोटो पाहून पसंत केला नवरा, लग्न मंडपात चेहरा पाहताच नवराई पसार

दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्नाची सर्व तयारी केल्यानंतर, लग्न मंडपात पोहचलेल्या नवरीने (Bride) आपल्या होणाऱ्या नवऱ्या मुलाचा चेहरा (After Seeing Grooms Face) पाहून भर लग्नातून धूम (Bride Run away) ठोकल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेतिया, 05 मार्च: दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्नाची सर्व तयारी केल्यानंतर, लग्न मंडपात पोहचलेल्या नवरीने (Bride) आपल्या होणाऱ्या नवऱ्या मुलाचा चेहरा (After Seeing Grooms Face) पाहून भर लग्नातून धूम (Bride Run away) ठोकल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांसोबत लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची पूर्णपणे नाच्चकी झाली आहे. या प्रकारानंतर नवऱ्या मुलाला मोकळ्या हाताने घरी परत जावं लागलं आहे. लग्नात आनंदाने डान्स करणाऱ्या वऱ्हाडींना देखील आल्या पावली परत जावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्र विचित्र प्रकार बिहारमधील बेतिया याठिकाणी घडला आहे. लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचलेल्या वधू-वर पक्षांत अचानक वादाला तोंड फुटलं. कारण वधुच्या मोठ्या बहिणीने नवऱ्या मुलीला भर मंडपातून घेवून पळ काढला आहे. वराच्या नातेवाईकांनी विवाहस्थळी बराच गोंधळ घातला आहे. नवऱ्या मुलीचे वडिल वीरेंद्र चौधरी यांनी सांगितलं की, माझ्या मुलीला मुलगा आवडला नाही. यामुळे ती मंडप सोडून निघून गेली आहे. खरंतर नवऱ्या मुलीला नवरदेवाचा फोटो WhatsApp च्या माध्यमातून पाठवला होता. त्यानंतर नवरीला मुलगा पसंत आला, त्यामुळे लग्नाला होकार दिला. दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी लग्नाची सर्व तयारी केली. स्वतःचा फोटो WhatsApp द्वारे पाठवणं नवऱ्या मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण वधू जेव्हा लग्न मंडपात पोहचली तेव्हा तिने वराला पहिल्यांदाच समोरासमोर पाहिलं. यावेळी तिला जबरदस्त घक्काच बसला. तिने आपल्या वर आवडला नसल्याचं सांगून टाकलं आहे. आणि लग्नातून पळ काढला. यानंतर दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांत चांगलीचं जुंपली होती. पण गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण मिटवतं घेतलं आहे. हे ही वाचा - मागणी नव्हे तर चक्क मुलीला पळवूनच नेतात; अपहरण करून लग्न करण्याची विचित्र प्रथा बगही मुसहरी येथील रहिवाशी असलेल्या नवरा मुलगा अनिल कुमार चौधरी यांचे वडील नथु चौधरी यांनी सांगितलं की, लग्नाच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे वर मुलगा मिरवणूक घेवून सर्व नातेवाईकांसह विवाहस्थळी आला होता. पण नवरीच्या मोठ्या बहिणीने तिला मंडपातून पळवून नेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचं कुटुंबयी बैरिया येथील तदवानंदपूर या गावातील रहिवाशी आहे. या विचित्र घटनेमुळे परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे. या घटनेबाबत कोणत्याही वधू किंवा वराच्या बाजूने कोणतीही तक्रार पोलिसांत दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या