विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव...
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं ट्विटर (Twitter Account) अकाऊंट तात्पुरत निलंबित (suspended) केलं गेलं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातल्या काही बड्या वरिष्ठ नेत्यांचेही अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या इतर पाच वरिष्ठ नेत्यांचे अकाऊंटही निलंबित केले आहे. बुधवारी रात्री काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेत असलेले पक्षाचे मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचं निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी बुधवारी रात्री ट्विट केलं की, राहुल गांधी यांच्यानंतर आता राजा नरेंद्र मोदीजी आणि जागीरदार जॅक ( ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे) यांनी रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. यावर काँग्रेसपक्ष विरोध दर्शवते आणि अन्यायांविरुद्ध लढण्याचं आम्ही वचन देतो.
एका तासाभरात त्यांनी आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, यादीत आणखीन सुद्धा आहे. ट्विटरनं जितेंद्र सिंह अलवर आणि मणिकम टागोर आणि काही अन्य नेत्यांचे अकाऊंट लॉक केलेत. हेही वाचा- LIVE: राज्यातल्या अनलॉकवर प्रशांत दामलेंची खास FB पोस्ट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार राहुल गांधी यांचंही ट्विटर अकाऊंट लॉक राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आलं. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. हा फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांच्याकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते.