JOIN US
मराठी बातम्या / देश / महाराष्ट्रानंतर आता 'या' ठिकाणी सुरू झालं तुरुंग पर्यटन, 24 तासांसाठी मोजावे लागणार इतके पैसे

महाराष्ट्रानंतर आता 'या' ठिकाणी सुरू झालं तुरुंग पर्यटन, 24 तासांसाठी मोजावे लागणार इतके पैसे

‘कैद्याच्या आयुष्यातला एक दिवस’ (A Day in Life of a Prisoner) असं या संकल्पनेचं नाव आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 18 ऑगस्ट : तुरुंग (Jail) हे कोणासाठी आवडीने जाण्यासारखं किंवा पर्यटनाचं ठिकाण (Jail Tourism) असू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर निश्चितच नकारार्थी असेल; मात्र तुरुंगातल्या कैद्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या दिनचर्येबद्दल तुम्हाला कुतुहल आहे का, असा प्रश्न विचारला तर मात्र अनेक जण होकारार्थी उत्तर देतील. अशा माणसांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, त्यांचं कुतुहल शमवण्यासाठी बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने (Hindalaga Central Jail) तुरुंग पर्यटन ही संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला सरकारची परवानगी मिळाली, तर तिची अंमलबजावणी होऊ शकेल. कैद्यांचं जीवन कसं असतं, त्यांना कशाप्रकारे त्यांना जगावं लागतं, त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी केली जाते, याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये, कोणतंही वाईट कृत्य करण्यास ते धजावू नयेत, यासाठी तुरुंग पर्यटन ही संकल्पना हिंडलगा कारागृहाने मांडली आहे. मृत्युदंड ठोठावण्यात आलेले काही कैदी, कुख्यात तस्कर वीरप्पनचे काही साथीदार, दांडूपाल्या गँगमधले काही गुंड, सीरियल किलर आणि बलात्कारी उमेश रेड्डी आदी 29 कैद्यांना या पर्यटनादरम्यान पर्यटकांना पाहता येऊ शकेल. **‘ दी न्यू इंडियन एक्स्प्रेस ’**ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रस्त्याच्या कडेला असलेले माइलस्टोन्स वेगवेगळ्या रंगांचे का असतात? त्या रंगांचा अर्थ काय? वाचा सविस्तर ‘कैद्याच्या आयुष्यातला एक दिवस’ (A Day in Life of a Prisoner) असं या संकल्पनेचं नाव आहे. त्यात इच्छुक पर्यटकांना 24 तासांसाठी 500 रुपये मोजून तुरुंगात कैद्यांसोबत राहता येणार आहे. तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात येणाऱ्या पर्यटकांना कैद्यांप्रमाणेच वागवलं जाणार आहे. त्यांची दिनचर्या अगदी कैद्यांप्रमाणेच असेल. तुरुंगातले सुरक्षारक्षक पहाटे पाच वाजता अन्य कैद्यांबरोबरच या पर्यटकांनाही उठवतील. त्यांना चहा देण्यात येईल; मात्र त्याआधीच कैद्यांप्रमाणे त्यांना त्यांची सेल स्वच्छ करावी लागेल. त्यानंतर तासभराने त्यांना नाश्ता दिला जाईल. सकाळी 11 वाजता त्यांना भात आणि सांबार असं जेवण दिलं जाईल. त्यानंतर रात्रीचं जेवण थेट सायंकाळी सात वाजता असेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांना नॉन-व्हेज जेवणही दिलं जाईल. वीकेंड्सला काही विशेष खाद्यपदार्थही दिले जातील. पर्यटकांनाही कैद्यांप्रमाणेच कपडे दिले जातील. त्यांना कैदी नंबरही दिला जाईल. तसंच, परिसराची स्वच्छता, बागकाम, जेवण बनवणं आदी कामांमध्ये कैद्यांसोबत त्यांना सहभागी व्हावं लागेल. रात्रीच्या वेळी त्यांना कैद्यांप्रमाणेच जमिनीवर चटई घालून त्यावर झोपावं लागेल. त्यांना कैदी असल्याचा फील येण्यासाठी त्यांच्या सेलला बाहेरून कुलूपही घातलं जाऊ शकतं, अशी माहिती तुरुंगातल्या सूत्रांकडून देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या