JOIN US
मराठी बातम्या / देश / बाबो! रस्त्यावर पसरल्या 2000 आणि 500 च्या नोटा; पैसे लूटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

बाबो! रस्त्यावर पसरल्या 2000 आणि 500 च्या नोटा; पैसे लूटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

अचानक रस्त्यावर पैसे पडल्याने लोकांची मोठी गर्दी झाली. कार, सायकल, बाईकवाले सर्वच जण आपल्या गाड्या थांबवून नोटा उचलण्यासाठी गर्दी करू लागले. ज्याच्या हातात ज्या नोटा येत होत्या, तो त्या घेऊन पसार होत होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोरखपूर, 20 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ऑटोमधून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याचे हजारो रुपये रस्त्यावर पडले. पडलेल्या हजारो रुपयांची लोकांनी लूट केली केल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर पडलेले पैसे जमा करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर कार चालकांपासून ते सायकल चालकांपर्यंत सर्वच जण पैसे जमा करण्यासाठी जमले. व्यापाऱ्याने पैसे रस्त्यावर पडल्यानंतर, लोकांकडून लूट होत असल्याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत पैसे जमा करण्यासाठी व्यापारी ऑटोमधून जात होता. व्यापाऱ्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशवीत 1,83,000 रुपये होते. त्यापैकी 1,26,000 रुपयांच्या नोटा रस्त्यावर पडल्या. बाकी 57000 हजार रुपये त्यांच्या पिशवीत होते. ऑटोमध्ये बसताना अचानक त्याच्याकडचे पैसे खाली पडले आणि रस्त्यावर पसरले. काही वेळातच पैसे लूटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. रस्त्यावर लोकांना पैसे जमा करताना पाहिल्यानंतर, त्यांनी आपली पिशवी तपासली आणि त्यांचेच पैसे रस्त्यावर चुकीने पडले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परंतु तोपर्यंत 84 हजार रुपये गायब झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 42 हजार रुपये जप्त केले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अचानक रस्त्यावर पैसे पडल्याने लोकांची मोठी गर्दी झाली. कार, सायकल, बाईकवाले सर्वच जण आपल्या गाड्या थांबवून नोटा उचलण्यासाठी गर्दी करू लागले. रस्त्यावर 50 पासून 100, 200, 500, 2000 च्या नोटा होत्या. ज्याच्या हातात ज्या नोटा येत होत्या, तो त्या घेऊन पसार होत होता. अशाप्रकारे लूटीची आतापर्यंत कोणतीही केस पाहिली नसल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या