JOIN US
मराठी बातम्या / देश / ...आणि वाघाने त्याला ठार मारले

...आणि वाघाने त्याला ठार मारले

23 सप्टेंबर : वाघाचं नाव जरी घेतलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो पण दिल्लीत एका तरूणाला वाघाला जवळून पाहण्याचा मोह जीवावर बेतला. वाघाने केलेल्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. मकसूद (20) असं या तरुणाचं नाव होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. घडलेली हकीकत अशी की, दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात दुपारी 2.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे प्राणी पाहण्यासाठी वर्दळ होती. अचानक एक तरूण वाघाच्या पिंजर्‍या पडल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहिती नुसार, हा विद्यार्थी या वाघाच्या पिंजर्‍याच्या अगदी जवळ उभा होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

delhi tigar 23 सप्टेंबर : वाघाचं नाव जरी घेतलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो पण दिल्लीत एका तरूणाला वाघाला जवळून पाहण्याचा मोह जीवावर बेतला. वाघाने केलेल्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. मकसूद (20) असं या तरुणाचं नाव होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

घडलेली हकीकत अशी की, दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात दुपारी 2.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे प्राणी पाहण्यासाठी वर्दळ होती. अचानक एक तरूण वाघाच्या पिंजर्‍या पडल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहिती नुसार, हा विद्यार्थी या वाघाच्या पिंजर्‍याच्या अगदी जवळ उभा होता. अचानक त्याच तोल गेला आणि तो थेट वाघाच्या पिंजर्‍यात पडला. पट्टेरी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. वाघाला जवळ पाहून त्याचा थरकाप उडाला आणि गोठलेल्या अवस्थेत तो वाघासमोर शांत बसला होता. वाघही त्यांच्या समोर येऊन काही वेळ उभा होता. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगडं मारली. त्यामुळे चवताळलेल्या वाघाने मकसूदवर हल्ला केला. त्याची मान जबड्यात पकडून त्याला ठार मारलं. मकसूदला ठार मारल्यानंतर त्यांचा मृतदेह वाघ आपल्या पिंजर्‍यात घेऊन गेला. धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रसंग घडत असताना तिथले सुरक्षारक्षकही या मकसूदला वाचवायला आले नाहीत, असं प्रत्यक्षदशीर्ंचं म्हणणं आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या