JOIN US
मराठी बातम्या / देश / साईबाबा देव नाहीत, धर्मसंसदेतही साईपूजेवरून वाद !

साईबाबा देव नाहीत, धर्मसंसदेतही साईपूजेवरून वाद !

25 ऑगस्ट : शिर्डीचे साईबाबा देव आहेत की नाही यावरुन धर्म संसदेत अपेक्षेप्रमाणे वादमय मंथन झालंय. छत्तीसगडमध्ये या धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात साईपूजेवरून जोरदार वाद झाला. या धर्म संसदेत साईबाबा देव नाहीत, या वक्तव्याचा पुनरुच्चार करण्यात आला. छत्तीसगडच्या कवर्धामध्ये या धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संसदेत साई भक्तांनी गोहत्येच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला त्यामुळे स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे समर्थक चांगलेच भडकले. त्यामुळे साई समर्थक आणि शंकराचार्य समर्थकांमध्ये शाब्दीक युद्ध रंगलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Sai Baba devotees 25 ऑगस्ट : शिर्डीचे साईबाबा देव आहेत की नाही यावरुन धर्म संसदेत अपेक्षेप्रमाणे वादमय मंथन झालंय. छत्तीसगडमध्ये या धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात साईपूजेवरून जोरदार वाद झाला. या धर्म संसदेत साईबाबा देव नाहीत, या वक्तव्याचा पुनरुच्चार करण्यात आला. छत्तीसगडच्या कवर्धामध्ये या धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या संसदेत साई भक्तांनी गोहत्येच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला त्यामुळे स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे समर्थक चांगलेच भडकले. त्यामुळे साई समर्थक आणि शंकराचार्य समर्थकांमध्ये शाब्दीक युद्ध रंगलं होतं. या अगोदर रविवारी झालेल्या संसदेत 13 आखाड्याच्या प्रमुखांनी साईबाबा हे देव आहे हे मान्य करण्यास नकार दिला. साई बाबा देव आहेत याचा कोणताही पुरावा नाही असं या प्रमुखांचं म्हणणं होतं. साईंना देव मानून लोकं चुकीच्या मार्गावर चालले आहे. त्यांना परत योग्य मार्गावर आणण्यासाठी संसद भरवावी असा युक्तीवादही त्यांनी केला. साईबाबा हे गुरू आहे ते कुणाचे अवतार नाही आणि ते संतही नाही असंही त्यांचं म्हणणं होतं.

ज्यांच्यामुळे हा वाद रंगला ते शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा हे देवच नाही आणि त्यांचं कुठलंही अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांची पूजा करण्यात कोणताही अर्थ नाही. साईंची मूर्ती हटवली जात नाहीये पण त्यांचं अस्तित्व शून्य केलं जात आहे. शंकाराचार्य एवढ्यावरच थांबले नाही तर साईंची पूजा केल्यामुळे मनुष्याचं जीवन खराब होत आहे असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

या संसदेसाठी शिर्डी संस्थानला निमंत्रण देण्यात आलं आहे पण संस्थानकडून मात्र कुणीही हजर नव्हतं. मात्र 13 आखाड्यांच्या प्रमुखांनीही शंकाराचार्यांच्या होकारात आपला सूर लगावला आहे. देशात अनेक समाधी -वस्तूंची पूजा केली जाते पण आपण त्याचा विरोध करत नाही पण देवाला त्या वस्तूशी जोडणं चुकीचं आहे असं मतही या प्रमुखांनी नोंदवलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

जाहिरात
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या