JOIN US
मराठी बातम्या / देश / Gujrat News : अहमदाबादमध्ये फॅक्टरीची भिंत कोसळली, तब्बल इतक्या जणांचा मृत्यू

Gujrat News : अहमदाबादमध्ये फॅक्टरीची भिंत कोसळली, तब्बल इतक्या जणांचा मृत्यू

गुजरातच्या अहमदाबाद येथून एक दु:खद (Sad News From Ahmedabad) बातमी समोर आली आहे. मोरबीच्या फॅक्टरीमध्ये अडकून एक भिंत (Morabi Factory Wall Collapsed) पडल्याने तब्बल 12 मजूरांचा मृत्यू झाला आहे. (12 People Died in Ahmedabad)

जाहिरात

फोटो - एएनआय

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 18 मे : गुजरातच्या अहमदाबाद येथून एक दु:खद (Sad News From Ahmedabad) बातमी समोर आली आहे. मोरबीच्या फॅक्टरीमध्ये अडकून एक भिंत (Morabi Factory Wall Collapsed) पडल्याने तब्बल 12 मजूरांचा मृत्यू झाला आहे. (12 People Died in Ahmedabad) तसेच या दुर्घटनेत आणखी अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 मजूर दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी घडली. अहमदाबादच्या सागर सॉल्ट फॅक्टरीमध्ये ही घटना घडली. जेसीबीच्या साहाय्याने अडकलेल्यांची सुटका करण्यात येत आहे. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. स्थानिक आमदार ब्रजेश मेरजा यांनी एएनआयशी या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, 12 मजदुरांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक दरम्यान, गुजरातमधील या दु:खद घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, मोरबीत भिंत कोसळल्याची घटना हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांच्या सोबत आहेत. जखमी लोक लवकर बरे होतील अशी आशा आहे. स्थानिक अधिकारी पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.

संबंधित बातम्या

फॅक्टरीची भिंत कशी पडली, हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, कारखान्यातून येणारी चित्रे विचलित करणारी आहेत. मिठाच्या पोत्यांमध्‍ये मजूर अडकले असतील, असेही सांगितले जात आहेत. सध्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या