21 सप्टेंबर : माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत. लष्करातील इंटेलिजन्स युनीटचा व्ही.के.सिंग यांनी गैरवापर केल्याची बातमी शुक्रवारी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकानं दिली होती. त्यानंतर सिंग यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. आपल्यावर हे आरोप जाणीवपूर्वक केले गेल्याचंही त्यांनी म्हटलंय. सिंग यांनी जम्मू काश्मिरचं सरकार उलथवून लावण्यासाठी गुप्त कारवाई केल्याचंही या बातमीत म्हटलं गेलं होतं. पण आपल्याला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सिंग यांनी स्पष्टीकरण दिलंय.