JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नाशिक / शिरपूरातील प्रशिक्षणार्थींचं विमान क्रॅश; आदिवासींनी वाचवला तरुणीचा जीव, एकाचा जागीच मृत्यू

शिरपूरातील प्रशिक्षणार्थींचं विमान क्रॅश; आदिवासींनी वाचवला तरुणीचा जीव, एकाचा जागीच मृत्यू

या विमानाने एका डोंगराला जोरदार धडक दिली आणि दरी-खोऱ्यात विमान क्रॅश झालं. याचा धक्कादायक फोटो समोर आले आहेत.

0105

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे प्रशिक्षण देणारे विमान कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विमान कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
0205

ही घटना दुपारी दोन दरम्यान घडली असून या विमानातील महिला प्रशिक्षणार्थीचा जीव वाचल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
0305

चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताला लागून असलेल्या या भागात 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात हा अपघात घडला.

जाहिरात
0405

वर्डीपासून दहा किलोमीटर अंतरावर ध्वज बल्ली नावाच्या डोंगरावर विमान धडकल्याने अपघात झाला आहे. आदिवासींनी विमानातील दोन जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक महिला प्रशिक्षक जिवंत असल्याचं दिसतं. या अपघातात विमानातील पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
0505

सदर विमान दरी-खोऱ्यांमध्ये कोसळले. या परिसरात पाड्यातील आदिवासींनी हा अपघात पाहिल्यानंतर ते धाव घटनास्थळी पोहोचले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या