JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात, 260 गावं कोरोनामुक्त

नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात, 260 गावं कोरोनामुक्त

Nashik Corona Updates: नाशिकच्या ग्रामीण भागातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 04 जून: नाशिकच्या ग्रामीण भागातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन आणि सरकराच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करण्यात आल्यानं मालेगाव, मनमाडसह या भागातही कोरोना आटोक्यात येत आहे. तब्बल 260 गावं कोरोनामुक्त झाली असून अनेक गावं कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्यानं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं ऑक्सिजन बेड देखील रिकामे झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं गेल्या दोन महिन्यात धुमाकूळ घातला होता. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत होते. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू देखील झाला. मात्र आता परिस्थितीत बदल झाला असून रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहे. कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन त्यांना काहीशी उसंत मिळत आहे. मात्र धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनामुक्त झालेले गावे मालेगाव तालुका -55 मनमाड-नांदगाव तालुका -55 चांदवड तालुका -40 बागलाण तालुका-81 येवला तालुका -21 देवळा तालुका -8 नाशिक जिल्ह्यात गुरुवारी नवीन 523 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकूण 972 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात 41 जणांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 4 हजार 830 वर पोहोचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या