JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नाशिक / मोठी बातमी: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मोठी बातमी: नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिकमधील हे उद्योगपती नितीन गडकरी यांचे निकटस्थ असल्याचंही समोर आलं आहे.

0105

नाशिकमधील (Nashik News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

जाहिरात
0205

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या तक्रारीवरुन जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसने घेतलेले कोट्यावधी रुपये परत करण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
0305

अशोक कटारिया यांच्यासह त्यांचा मुलगा आशिष कटारिया स्नेहल पारख सतीश पारख हे देखील या प्रकरणात सह आरोपी असल्याचं समोर आलं आहे. अशोक कटारिया हे अशोका बिल्डकॉम, अशोका स्कुल, अशोका हॉस्पिटल या नामांकित सस्थांचे मालक आहेत.

जाहिरात
0405

फिर्यादी ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे माजी राज्यसभा सदस्य, शरद पवार यांचे निकटस्थ, आणि एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव करणाऱ्या माजी आमदार मनीष जैन याचे वडील आहेत.

जाहिरात
0505

जळगावातील राजमल लखीचंद या प्रसिद्ध सोने व्यावसायिक म्हणूनही ईश्वरलाल जैन यांची ओळख असून उद्योगपती अशोक कटारिया हे नितीन गडकरी यांचे निकटस्थ असल्याचंही सांगितलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या