JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नाशिक / धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या; पगार होत नसल्याने केला आयुष्याचा शेवट

धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या; पगार होत नसल्याने केला आयुष्याचा शेवट

नियमित पगार होत नसल्याने एसटी चालकाने आत्महत्या केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

0105

धुळे जिल्ह्यातील साक्री येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे साक्री एसटी डेपोमधील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री एसटी डेपोमधून ही घटना समोर आली आहे.

जाहिरात
0205

एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

जाहिरात
0305

या आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0405

आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
0505

साक्री आगारातील संतप्त कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्याच्या आत्महत्येनंतर आंदोलन पुकारलं आहे. मृत बेडसे यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही सरकारकडून केली जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या