JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नागपूर / नागपुरात दुपारी 12 वा. काय घडलं? हसतं-खेळतं माटूळकर कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त, PHOTOS पाहून हृदय पिळवटून निघेल

नागपुरात दुपारी 12 वा. काय घडलं? हसतं-खेळतं माटूळकर कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त, PHOTOS पाहून हृदय पिळवटून निघेल

या प्रकरणात पाच जणांची हत्या करण्यात आली आणि शेवटी अलोक याने आत्महत्या केली.

0105

नागपूरात घडलेल्या हत्याकांडामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. एक हसरं-खेळतं कुटुंब काही क्षणात उद्ध्वस्त झालं. या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल.

जाहिरात
0205

तहसील पोलीस स्टेशनच्या (Tehsil Police Station) हद्दीत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Murder of 5 members of the same family) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने आत्महत्या केली आहे.

जाहिरात
0305

अलोक माटूळकर (Alok Matulkar) याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

जाहिरात
0405

अलोक हे टेलरिंगचे काम करायचे. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

जाहिरात
0505

अशोकने आपल्या लहान मुलाचीही यात हत्या केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या