JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / खाकी वर्दीतील देव माणूस! ... अन् वयोवृद्ध आजींच्या मदतीला धावून आले पोलीस कर्मचारी

खाकी वर्दीतील देव माणूस! ... अन् वयोवृद्ध आजींच्या मदतीला धावून आले पोलीस कर्मचारी

पावसाळ्यात घराचं छप्पर गळू नये यासाठी अनेकजण कौलांवर प्लास्टिक टाकत असतात. नागपूर पोलिसांनी अशाच प्रकारे एका आजीबाईंना मदत केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 18 जून: वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी वृद्धाश्रमात सोडल्याचं तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. वृद्ध आई-वडिलांचा सांभाळही करत नसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत असतात. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे ज्यामुळे नागपूर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. होय, कारण नागपूर पोलिसांनी एका वयोवृद्ध आजींवर आलेले संकट पाहून तिच्या मदतीला धाव घेतली आहे.

पोलिसही माणसे आहेत तेही माणुसकीच्या नात्याने मदत करतात पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं माणुसकीचे दर्शन घडविणारी अशीच एक घटना शातीनगर परीसरात घडली. पावसाळ्याचे दिवस असल्याने दररोज पाऊस पडत असतो पावसाचे पाणी कवेलुच्या घरात घुसून पूर्ण घरच पूर सदृश्य झाल होत घरात कोणीच नसल्यानं पावसाच्या पाण्यापासून संरक्षण कसे करावे हे सुचले नाही पाणी थांबे पर्यंत ती तशीच राहिली.

संबंधित बातम्या

पाऊस थांबल्या नंतर शांतिनगर येथील 70 वर्षाची आजीबाई घरातील पाणी काढू लागली. ही माहिती डीसीपी झोन 3 चे लोहित मतांनी आणि शांतिनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जामदार व स्टाफ शांतिनगर हद्दीत रूट मार्च करताना त्यांना माहिती कळाली माणुसकीच्या नात्याने 70 वर्षीय महिलेच्या घरातून पाणी काढण्यास मदत केली. त्यानंतर घरावर ताडपत्री हंथरून देण्यात मदत केली ती वृध्द महिला एकटीच राहत असल्याने तिला मदतीसाठी कोणी नव्हते असे माहितीतून कळले. मोठी बातमी! उद्यापासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पावसाळ्यात चाळीत राहणाऱ्या नागरिकांचे कौल, छप्पर गळतात आणि त्यामुळे मोठ्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नागरिक आपल्या घराच्या पत्र्यांवर किंवा कौलांवर प्लास्टिकचे आवरण घालतात जेणेकरून घरात पाणी गळणार नाही. अशाच एका आजीबाईंना संकटात पाहिल्यावर त्यांच्या मदतीला नागपूर पोलीस देवदूतासारखे धावून आले. नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेत हा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा केला जात आहे. या आजीबाई आपल्या घरात एकट्याच राहतात. या आजींच्या मदतीला पोलीस धावून आले आणि तिच्या घरावर छप्पर टाकून देण्यासही मदत केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या