JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / VIDEO: कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; संतप्त नातेवाईंकाकडून रुग्णालयात तोडफोड

VIDEO: कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; संतप्त नातेवाईंकाकडून रुग्णालयात तोडफोड

कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर संतप्त झालेल्या नातेवाईकांना रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 27 एप्रिल: कोरोना बाधित रुग्णाचा (Covid patient) उपचारादरम्यान मृत्यू (Patient died) झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड (angry relative vandalised hospital) केल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेड शाह रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेड शाह रुग्णालयात घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका महिला कोरोना बाधिताला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलीची प्रकृती चिंताजनक होती आणि उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

नातेवाईकांचा गंभीर आरोप रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचा ऑक्सिजन मास्क काढल्याने मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत तोडफोड सुद्धा केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाले आणि त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्येही तोडफोड नाशिकमध्ये नगरसेविका असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटल प्रशासनावर आरोप करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. इतकच नाहीतर हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुद्धा केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या