गेले काही दिवस नागपुरातील कोरोनाची (Coronavirus in Nagpur) धक्कादायक आकडेवारीच तुम्ही पाहिली आता ते प्रत्यक्षातच पाहा.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोनाची फक्त धक्कादायक आकडेवारी तुम्ही पाहत आहात. खरंच ही परिस्थिती किती भयंकर आहे, याचे फोटो समोर आले आहेत.
रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की सरकारी रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी जागाच नाही. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्ण ठेवले जात आहेत.
हे फोटो नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्टिपलमधील (जीएमसीएच) आहेत. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने लोक सरकारी रुग्णालयात येत आहेत. शिवाय ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जीएमसीएचमध्येच पाठवलं जातं आहे.
नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंधांची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.