Three Cobra on Tree: नागपूरजवळच्या मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटाच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला. त्याच्या शेजारी आणखी एक कोब्रा बसला होता. बाजूलाही एक होता. एकाच वेळी एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं अद्भूत दृश्य पाहायला मिळालं.
अशा प्रकारचा काळा कोब्रा दिसणं ही दुर्मिळ बाब असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या कोब्रांचा एकत्र फोटो मिळणं ही फारच दुर्लभ बाब मानली जात आहे.
कोब्रा, अजगर आणि इतर प्राणी दिसणं हे मेळघाटात काही नवं नाही. मात्र एकाच झाडावर तीन कोब्रा दिसणं, ही बाब मात्र खास असल्याचं मेळघाटवासी सांगतात.
तीन कोब्रा एका झाडावर पाहायला मिळणं, हा अत्यंत दुर्मिळ योग असून त्याचे फोटो जपून ठेवावेत, असा सल्ला देण्यात येत आहे.