IWD 2021: मुंबईतील मध्य रेल्वेचं माटुंगा स्थानक (Matunga station Mumbai) संपूर्ण गुलाबी रंगात रंगवण्यात आलं आहे. काय आहे त्यामागची गोष्ट? सुस्मिता भदाणे-पाटील यांचा फोटो रिपोर्ट
मुंबई: मुंबई नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. आजही अशाचं एका आगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे मुंबईची चर्चा होत आहे. ती गोष्ट म्हणजे मुंबईतील मध्य रेल्वेचं माटुंगा स्थानक संपूर्ण गुलाबी रंगात रंगवण्यात आलं आहे.
मुंबईची लाईफलाईन सांभाळणाऱ्या या महिलांच्या सन्मानासाठी रेल्वे प्रशासनाने हे माटुंगा रेल्वे स्थानक गुलाबी रंगात रंगवलं आहे.
येथे काम करणाऱ्या महिलांचा खऱ्या अर्थाने आज महिला दिन साजरा झाला असं म्हणावं लागेल. संपूर्ण माटुंगा स्थानक गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे.