JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / वाढदिवशी कोरोनाला हरवलं; 101 वर्षीय आजोबांचं रुग्णालयात सेलिब्रेशन, केक खाऊन झाले डिस्चार्ज

वाढदिवशी कोरोनाला हरवलं; 101 वर्षीय आजोबांचं रुग्णालयात सेलिब्रेशन, केक खाऊन झाले डिस्चार्ज

या 101 वर्षांच्या आजोबांनी करुन दाखवलं. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरु नका या आजारातून बाहेर पडणे शक्य आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : देशभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र कोरोना झाला म्हणजे सर्व संपलं असं नाही. आतापर्यंत अनेक वयस्कर रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. मुंबईतील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात एका 101 वर्षीय कोरोना रुग्णाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अरुण गोविंद नारिंग्रेकर असं त्यांचे नाव आहे. ते उद्या 101 वर्षांचे होणार आहेत. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

संबंधित बातम्या

देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी त्याला हरवणं शक्य आहे. काही नियमांचे पालन केले तर कोरोनातून बाहेर पडत येऊ शकतं. याचं चांगलं उदाहरण म्हणजे अर्थात 101 वर्षांचे आजोबा आहेत. मुंबई आण राज्यात कोरोना रुग्णांच्या (Covid-19 Patient) संख्येत सुरु असलेली विक्रमी वाढ कायम आहे. आज 6741 नव्या रुग्णांची भर पडली तर 213 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,67,665 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या 10695 एवढी झाली आहे. मुंबईत (Mumbai Coronavirus update) आज  954 नवे रुग्ण आढळले. तर 70 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 95100 तर मृत्यूसंख्या 5405वर गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या