पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन आणि प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश येत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.
मुंबई, 19 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने CBI कडे पुढील तपास सोपविल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांबरोबर विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत होती. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर आता अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य सरकार सीबीआय तपासाला सहकार्य करेल असे ते यावेळी म्हणाले. मुंबई पोलिसांच्या तपासात कुठेही दोष नसून त्यांनी योग्य प्रकारे तपास केल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. पुढे गृहमंत्री यांनी सुशांत प्रकरणात राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘संघराज्याची संकल्पना, त्याबाबत घटनातज्ज्ञांनी मंथन करावं, विरोधकांचं बिहार निवडणुकीसाठी राजकारण चाललं आहे. राज्य सरकार समकक्ष तपास करेल. हे वाचा- IVE : सुशांत प्रकरणाचा तपास CBI कडे; महाराष्ट्र फेरयाचिका करणार का? सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याबाबत गृहमंत्र्यांनी होकार दिलेला नाही. दुसरीकडे सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत प्रकरणाबाबत कायदेतज्ज्ञांच्या टीमशी बोलणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्यापही ठाकरे सरकारने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत फेरयाचिकेबाबत खुलासा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही ठाकरे सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नसल्याचे दिसून येते.