मुंबई, 19 जुलै: मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईतील चेंबूर (Chembur) आणि विक्रोळी (Vikhroli) भागात दरड कोसळल्याची दुर्घटना ताज्या असताना आणखी एक दुर्घटना घडली आहे, ती सुद्धा विक्रोळीतच. कालच विक्रोळीत घरांवर दरड कोसळून (landslide) दहा जणांचा मृत्यू झाला असतानाचा आज पुन्हा एकदा विक्रोळीत दरड कोसळली आहे. ही दरड विक्रोळीतल्या पार्क साईट भागात कोसळली आहे. कैलाश कॉम्प्लेक्स जवळील पॉपटेटे्स या हॉटेलवजळ दरड कोसळली. याचे फोटो आता समोर आले आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र एका कारचा नुकसान झालं आहे.
यात दोन कारवर दरड कोसळल्यानं कारचं बरंच नुकसान झालं आहे. पावसाळ्यात साखर, मीठामध्ये ओलावा तयार होण्याचं No Tension! फॉलो करा या टिप्स विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. (ground-plus-one residential building collapsed) विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली.