JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Vat Purnima 2021 wishes in Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज

Vat Purnima 2021 wishes in Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज

Vat Purnima 2021 messages: वटपौर्णिमेचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी महिला पूजा, उपवास करतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून: Vat Purnima 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: वटपौर्णिमा या सणाला स्त्रियांमध्ये एक वेगळेच महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा (Vat Purnima) साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी 24 जून 2021 रोजी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेला सौभाग्यवती आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळावे यासाठी व्रत करतात. उपवास करुन वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा कोविडच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना गर्दी न करता उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा इतरांना देऊ शकतात. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (Vat Purnima wishes message) देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही खास मेसेजेस. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Vat Purnima 2021 Wishes Marathi Messages)

पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण करणाऱ्या सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

पतीसोबत रक्षणार्थ सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त माता भगिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

साथ सात जन्मांची, त्यागाची… नात्यांतल्या प्रेमाची, अन् विश्वासाची… वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी  एक फेरा दीर्घायुष्यासाठी  एक फेरा तुझ्या-माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सण सौभाग्याचा… बंध अतूट नात्याचा  या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या इच्छा  सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

दोन क्षणाचे असते भांडण  सात जन्माचे असते बंधन  कितीही आले जरी संकट  नेहमी आनंदी राहो  आपले सहजीवन  वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

सौभाग्याची प्रार्थना… वटवृक्षाची आराधना… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या