JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अबब! उर्मिला मातोंडकरांच्या नव्या ऑफिसची किंमत ऐकून व्हाल थक्क

अबब! उर्मिला मातोंडकरांच्या नव्या ऑफिसची किंमत ऐकून व्हाल थक्क

राजकारणी उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar)यांनी त्यांची नवी इनिंग जोशात सुरु केली असून त्यासाठी मुंबईतील खार भागात एक अलिशान ऑफिस खरेदी केले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी त्यांची काँग्रेसमधील छोटी कारकीर्द संपवून नुकताच शिवसेनामध्ये (Shiv Sena)   प्रवेश केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारनं त्यांची राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या आमदार म्हणून शिफारसही केली आहे. राजकारणी उर्मिला यांनी त्यांची नवी इनिंग जोशात सुरु केली असून त्यासाठी मुंबईतील खार भागात एक अलिशान ऑफिस खरेदी केले आहे. किती आहे ऑफिसची किंमत? ‘मुंबई मिरर’ नं दिलेल्या वृत्तानुसार उर्मिला यांनी खार पश्चिममध्ये (Khar West) लिंकींग रोडला अलिशान ऑफिस खरेदी केले असून या ऑफिसची किंमत 3 कोटी 75 लाख रुपये इतकी आहे. लिंकीग रोडवरील ‘दुर्गा चेंबर्स’ या सात मजली इमारतीमध्ये त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. या इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे. तर वरील मजल्यांवरील ऑफिसचे दरमहा भाडे 5 ते 8 लाख रुपये आहे. उर्मिला यांनी या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील 96.61 चौरस मीटर म्हणजेच 1039.901 चौरस फुट ऑफिस खरेदी केले आहे. उर्मिला यांनी या ऑफिसच्या प्रत्येक चौरस फुटासाठी 36 हजार रुपये मोजले आहेत. राजेश कुमार या व्यावसायिकाकडून त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. या ऑफिसच्या खरेदीची प्रक्रीया 28 डिसेंबरला झाल्याची माहिती आहे. उर्मिला यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ‘या ऑफिसच्या रेडी रेकनरचा दर हा जवळपास 4 कोटी जास्त असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्मिला यांनी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणून 80 हजार 300 रुपये तर रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रुपये भरले आहेत. उर्मिलांची राजकीय कारकीर्द उर्मिला यांनी काँग्रेस पक्षातर्फे उत्तर मुंबईतून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत  भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सुमारे वर्षभर ‘लो प्रोफाईल’ राहिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranut) टीकेला उर्मिला यांनी उत्तर दिलं. उर्मिलांनी अभिनेता सुशांत सिंहच्या (Sushant Singh) मृत्यूनंतर झालेल्या वादामध्येही मुंबई पोलिसांची ठाम बाजू घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं विधानपरिषदेच्या आमदरकीसाठी त्यांची राज्यपालांकडे शिफारस केली. आता त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या