JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BIG BREAKING विधान परिषदेसाठी सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून खडसे

BIG BREAKING विधान परिषदेसाठी सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून खडसे

NCP ने राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचं समजतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 11 नोव्हेंबर:**काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचं नाव विधान परिषदेसाठी घेतलं जात होतं, पण कुठला पक्ष त्यांना उमेदवारी देणार हे काही स्पष्ट झालं नव्हतं. अखेर शिवसेनेकडून मातोंडकर यांचं नाव विधान परिषदेसाठी सुचवण्यात आलं आहे.विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावं सुचवण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 4 - 4 नावं पुढे आली आहेत. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या निवाची शिफारस करण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस करण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीकडून भाजपमधून आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव सुचवण्यात आलं आहे. याशिवाय NCP ने राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जेमतेम 5 महिने पक्षात राहिल्या. मुंबईतून निवडणूक हरल्यानंतरही काही काळ त्या काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी  पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला वैतागून त्यांनी काही महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू झाल्यानंतर उर्मिला यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. शिवसेना मातोंडकर यांच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस करणार असल्याच्या बातमीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या