JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai : मेलोडिकाच्या स्वरांनी शिवाजी पार्क प्रसन्न करणारा कलाकार, पाहा Video

Mumbai : मेलोडिकाच्या स्वरांनी शिवाजी पार्क प्रसन्न करणारा कलाकार, पाहा Video

Mumbai melodica : उदय साळुंखे यांच्या मेलोडिकाच्या मधुर आवाजाने संपूर्ण शिवाजी पार्क सुरमय होतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी : एखादे वाद्य वाजवायला शिकणे ही तुम्ही कधीही करणार असलेल्या सर्वात छान गोष्टींपैकी एक आहे. एखाद वाद्य शिकण्यासाठी वयेची मर्यादा नसते. अशीच आवड मुंबई तील दादरमध्ये राहणारे 65 वर्षीय उदय साळुंखे यांनी जोपासली आहे. उदय हे गेल्या 10 वर्षांपासून मेलोडिका हे वाद्य वाजवतात. त्यांच्या मेलोडिकाच्या मधुर आवाजाने संपूर्ण शिवाजी पार्क सुरमय होतो. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे असलेल्या जिप्सी रेस्टॉरंट बाहेर उदय साळुंखे यांचा 40 वर्षांपासून कुल्फी विक्रीचा व्यवसाय आहे. लहानपण दादरमध्ये गेल्याने उदय यांना सांस्कृतिक आवड जोपासण्याची सवय आहे. उदय यांचे वडील सुद्धा अनेक वाद्य वाजवत त्याच बरोबर आई सुरेख गाण गात असे त्यामुळे लहान पणापासून संगीता बद्दल आवड त्यांना होती. तीच आवड जोपासत त्यांनी बालपणात बुलबुल हे वाद्य वाजवत. आता आवड म्हणून मेलोडिका हे वाद्य वाजवतात.

उदय साळुंखे सांगतात की, हे वाद्य सहसा कोणीही वाजवत नाही मोठमोठे कलाकार हे वाद्य वाजवतात. मात्र, मला हे वाद्य वाजवण्याची आवड असल्याकारणामुळे हे वाद्य मी विकत घेऊन आपली आवड जोपासली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी शिवाजी पार्क येथे हे वाद्य वाजवत असून अनेक रसिकांकडून माझं कौतुक केलं जातं. कसं वाजवलं जात मेलोडिका वाद्य? मेलोडिका हे वाद्य दिसायला पियानो सारखं असतं मात्र एका बाजूला पाईप असल्यामुळे तोंडाने पाईप द्वारे फुंकून मेलोडीका वाद्य वाजवलं जात. मेलोडी का वाद्य वाजवताना फुंकर वर खाली करून आपल्याला हवा तसा सूर काढता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या