JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : राज्याच्या राजधानीत कोणत्या सापांचा आहे वावर? पावसाळ्यात अशा जागी बसतात लपून!

Mumbai News : राज्याच्या राजधानीत कोणत्या सापांचा आहे वावर? पावसाळ्यात अशा जागी बसतात लपून!

साप दिसला तर काय करावं? मुंबईत कोणत्या प्रकारचे साप आढतात पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : साप म्हटले की भल्याभल्यांची बोबडी वळते. नुसते नाव जरी घेतले तरी सर्वत्र एकच धावपळ होते. त्यात पावसाळ्यात जागोजागी हे सर्पमहाशय बाहेर निघतात. पावसाळ्यात अनेकांच्या घरात, अंगणात साप निघतात. त्यात घर जुने आणि दलदल वा दाट झाडींच्या परिसरात असेल तर हमखास अशा ठिकाणी साप निघतात. त्यामुळे घरामध्ये किंवा अंगणात साप दिसला तर काय करावं? मुंबईत कोणत्या प्रकारचे साप आढतात याबाबत मुंबईतील सर्पमित्र परेश पानसरे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. साप विषारी असो की बिनविषारी; तो दिसला की भल्या भल्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहत नाही. मागील काही दिवसांपासून शहराच्या कानाकोपऱ्यात साप निघत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे सापांचे आश्रयस्थान असलेल्या बिळात पाणी शिरल्याने त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी साप हे सुरक्षित स्थळ शोधतात. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागात सापांचा संचार वाढू लागला आहे. सापांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीसुद्धा पहावयास मिळत आहे. पण अशा वेळी गांगरून न जाता, न घाबरता सर्पमित्रांना फोन वा मोबाइलवर संपर्क साधल्यास निश्चितच आपणास मदत होईल.

मुंबईत कोणते साप आढतात? सर्प मित्र परेश पानसरे सांगतात की, मी गेल्या आठ वर्षांपासून सर्प मित्र म्हणून काम करत आहे. मोडकळीस आलेली इमारत, तळमजल्यावर असलेलं घर या ठिकाणी साप आढळतात. त्याच कारण असं आहे की सापांना शांतता असलेली जागा आवडते. एखादी मोडकळीस आलेली जागा किंवा अडगळीच्या जागेत आपल्या पायांचा आवाज किंवा मनुष्याचे येणं जाणं कमी असतं. त्यामुळे शांतता असल्याने साप याठिकाणी राहणं पसंत करतात.

Pune News : तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल, असा साप आढळला पुण्यात, Video

संबंधित बातम्या

जंगल नष्ट होत असल्यामुळे, नवीन इमारती, घर, तयार होत असल्यामुळे सर्व साप हे मनुष्य वस्तीमध्ये आढळला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला साप  दिसला तर तुम्ही 1926 या टोल फ्री नंबर वर संपर्क करू शकतात. मुंबई सारख्या ठिकाणी घोणस, फुरसे, नाग, मणियार या विषारी सापाच्या प्रजाती आढळतात. तर हरण टोळ, जाड रेती सर्प, मांजर्या सर्प, हे मध्यम विषारी जातीचे साप आढतात आणि धामण, तस्कर, मांडूळ, हे बिन विषारी सापाच्या प्रजाती आढळतात, असं परेश पानसरे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या