ठाणे, 06 ऑगस्ट: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक सिग्नल यंत्रणेचा (Signal System) वीजपुरवठा खंडित (Power Supply Cut) केल्याची घटना समोर आली आहे. वाहतूक व्यवस्थापनाकडून वीजबिल (Light Bill) न भरल्यानं महावितराणानं हे पाऊल उचचलं आहे. व्यवस्थापनाकडून मागील 136 दिवसांचं वीजबिल भरलं नाहीये, त्यामुळे महावितरणानं ही कारवाई केली. सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित केल्यानं वाहतूकीचा फज्जा उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती व्यवस्थापनाला देखील माहीत नसल्याचं समोर आलं आहे. सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. या सिग्नल यंत्रणेचं व्यवस्थापन स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडे आहे. हेही वाचा- मुंबईकरांसाठी खूशखबर! MHADA च्या 8 हजार घरांची लॉटरी, 23 ऑगस्टपासून फॉर्म खरंतर, गेल्या वर्षी स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरात विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये अद्ययावत सिंग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याणमधील गजबजलेल्या लालचौकी परिसरातही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून या सिग्नल यंत्रणेचा वीजबिल भरलं नाही. त्यामुळे महावितरणानं वीजपुरवठा खंडित करून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला दणका दिला आहे. हेही वाचा- गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी 40 अतिरिक्त ट्रेन;कोरोना काळात हा नियम अनिवार्य ठाण्यातील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचं मागील 136 दिवसांचं 11 हजारांचं बिल थकीत आहे. हे बिल न भरल्यानं सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.