मुंबई, 21 जून : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातील राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने पहिल्या लाटेपेक्षाही कहर केला होता. दरम्यान आज दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. ही सर्वांसाठीच दिलासा देणारी बाब आहे. (Maharashtra Corona Update) आज राज्यातून 13,758 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 57,33,215 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89% एवढे झाले आहे. (Coronavirus) आज राज्यात 6 हजार 270 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून आज 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5979051 (15.07टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 671685 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1.24,398 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे ही वाचा- भयंकर! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण दरम्यान रविवारी राज्यातल्या 15 शहरांमध्ये एकही मृत्यूची (COVID-19 fatality) नोंद नाही आहे. मात्र दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत आहे. रविवारी राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं दिसत आहे. (zero COVID-19 deaths) रविवारी मुंबई विभाग, ठाणे, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर जिल्हा, वसई विरार आणि रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा, जळगाव शहर, सोलापूर, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, नांदेड जिल्हा आणि शहर, अकोला, सोलापूर, अमरावती, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा आणि शहर या शहरांमध्येही कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही.