JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Video: नायलॉन मांजा गळ्यात अडकला आणि...पोलीस अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव

Video: नायलॉन मांजा गळ्यात अडकला आणि...पोलीस अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव

मुंबईतील एक पोलीस अधिकारी दोन वर्षांपूर्वी मकर संक्रातीच्या दरम्यान नायलॉन मांज्यामुळे जखमी झाले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची परंपरा चालत आलेली आहे. मोकळ्या आकाशात उंच पतंग उडविण्यात अनेक जण गुंग असतात. हा पतंग कापल्यानंतर मांज्यामुळे अनेकांना दुखापत होते. नायलॉनचा मांजा पक्ष्यांच्या तर जीवावर बेततो. पण, त्याचबरोबर मुंबईतील एक पोलीस अधिकारी देखील या मांज्यामुळे गंभीर जखमी झाले होते. दोन वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात घडलेला हा प्रसंग त्यांच्या आजही लक्षात आहे. नेमकं काय घडलं होतं? मकर संक्रांतीच्या काळात घडलेल्या या अपघाताच्या जखमा सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांच्या मनावर खोलवर रुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दरम्यान ते जनजागृती करतात. दुचाकीस्वार, शाळकरी मुलं, पादचारी यांना राकेश नायलॉन मांज्याचे दुष्परिणाम समजावून सांगतात. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगामुळे त्यांना नेहमी एक भीती सतावत असते. Video : संक्रांतीनिमित्त कामाला येणारं जुगाड, 10 रुपयात टळतो मोठा धोका! राकेश 2021 साली जानेवारी महिन्यात कामानिमित्तानं कोर्टात जात होते. त्यावेळी जेजे उड्डाणपुलावर त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यानं ते जखमी झाले. नायलॉन मांजाने त्यांचा गळा कापला गेला. त्यांच्यावर ऑपरेशन करून दाहा टाके पडले. आपला गळा कापला गेलाय हे त्यांना सुरूवातीला समजलंच नाही. पण, आजूबाजूच्या लोंकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर एक तास ऑपरेशन झालं आणि ते या संकटातून सुखरुप बाहेर पडले.

कुणावरही वेळ येऊ नये म्हणून… आपल्यावर ओढावलेली वेळ इतरांवर येऊ नये म्हणून राकेश गवळी संक्रातीच्या दरम्यान जनजागृती करतात. ते दुचाकी स्वारांना 30 चा स्पीड ठेवून गाडी चालवण्याची सूचना करतात. त्यामुळे मांजांमुळे होणारे अपघात टळू शकतील. जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्तालयाकडून आम्हाला नायलॉन मांजावर कारवाई करण्याचे आदेश आले आहेत. यंदा ही कारवाई होणारच असे, राकेश यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या