JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: ठाण्यातल्या क्वारंन्टाइन सेंटरची दुरावस्था, घाणीचं साम्राज्य आणि असाह्य रुग्ण

VIDEO: ठाण्यातल्या क्वारंन्टाइन सेंटरची दुरावस्था, घाणीचं साम्राज्य आणि असाह्य रुग्ण

इथे डॉक्टर्सही नियमित येत नसल्याची तक्रार इथल्या रुग्णांनी केलीय. त्यांना मास्क आणि सॅनिटाझरही पुरवण्यात येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे 23 मे : वाढत चाललेल्या करोना बाधीत रुग्णांमुळे प्रशासनावर ताण आला असून याचा परिणाम आता क्वारंटाइन सेंटर्सवर दिसू लागला आहे. काही ठिकाणी साफ सफाई होत नाहीये तर काही ठिकाणी रुग्णांची गैरसोय होत आहे.  ठाण्याच्या घोडबंदर येथे असलेल्या न्यू होरायझन शाळेत क्वारंन्टाइन सेंटर आहे. काही शे बेडची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. मात्र या सेंटरची अवस्था काही दिवसांमध्येच बकाल झाली आहे. सगळीकडे घाण साचली आहे. अनेक दिवस स्वच्छताच केली जात नाही. त्यामुळे इथले रुग्ण त्रासून गेले असून या वातावरणामुळेच आमचा आजार वाढू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या दुरावस्थेचे फोटो आणि व्हिडीओ इथल्या रुग्णांनीच सोशल मीडियावर टाकले असून त्यामुळे खरी परिस्थिती उघड झाली. जेवणाची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, आणि जमिनीवर घाणीचे साम्राज्य अशी परिस्थिती आहे. इथे डॉक्टर्सही नियमित येत नसल्याची तक्रार इथल्या रुग्णांनी केलीय. त्यांना मास्क आणि सॅनिटाझरही पुरवण्यात येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ठाणे महापालिकेकडून कारवाई होणार असल्याचं सांगितलं गेलं मात्र परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी इथल्या रुग्णांनी केली आहे.

दरम्यान, आज ठाणे महापालिका क्षेत्रात 134 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1891 झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या