JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / देवा किती रे प्रतीक्षा! साईबाबांच्या दर्शनासाठी चेन्नईहून निघालेलं विमान थेट मुंबईला लँड

देवा किती रे प्रतीक्षा! साईबाबांच्या दर्शनासाठी चेन्नईहून निघालेलं विमान थेट मुंबईला लँड

कोरोना काळानंतर आता कुठं मंदिरं खुली झाली आहेत. चेन्नईहून आलेलं हे विमान शिर्डी विमानतळावर लँड झालंच नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 13 ऑक्टोबर : कोरोना काळानंतर (Corona Virus) आता राज्यभरातील मंदिर खुली करण्यात आली आहे. त्याशिवाय शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) देखील खुलं करण्यात आलं आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक देवदर्शनासाठी जात असल्याचं दिसून येत आहे. दरवर्षी देशभरातून लाखो भक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येतात. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आणल्यामुळे सध्या राज्यातील मंदिरं खुली करण्यात (Temples in the state were opened) आली आहेत. चेन्नईहून साईबाबांच्या दर्शनाला आलेलं विमान शिर्डी विमानतळावर न थांबता थेट मुंबईला पोहोचलं. दृश्यमानता कमी असल्याने चेन्नईहुन आलेलं विमान थेट मुंबईला लँड झालं. शिर्डी विमानतळावर आजच चेन्नईहून आलेलं विमान उतरल नाही. विमान लँड करताना 4000 मीटर दृश्यमानता असल्यानं विमान थेट मुंबईकडे रवाना झालं. (The plane that left Chennai for Sai Baba’s darshan landed directly in Mumbai) हे ही वाचा- राज्याला मान्सूनचा शेवटचा तडाखा बसणार; पुढील 24 तासांत या जिल्ह्यांत कोसळधार! विमान लँडिंग करण्यासाठी 5000 मीटर पर्यंत दृश्यमानता हवी होती. मात्र ती नसल्याने विमान शिर्डीला लँड केलंच नाही. या विमानात 126 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी विमानतळ व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांचा दुजोरा दिला आहे. दरम्यान हवामान खात्याने आज पुण्यासह, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या