JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Thane Lift Stuck Case : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची लिफ्ट मध्येच बंद, पुढे घडलं धक्कादायक

Thane Lift Stuck Case : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची लिफ्ट मध्येच बंद, पुढे घडलं धक्कादायक

मुंबई आणि परिसरात लिफ्ट अडकण्याचे प्रकार घडत आहेत. परवा, काल आणि पुन्हा आज असे तीन दिवस वेगवेगळ्या घटनांमध्ये लिफ्ट अडकण्याचा प्रकार समोर

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 13 डिसेंबर : मागच्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात लिफ्ट अडकण्याचे प्रकार घडत आहेत. परवा, काल आणि पुन्हा आज असे तीन दिवस वेगवेगळ्या घटनांमध्ये लिफ्ट अडकण्याचा प्रकार समोर आला आहे. आज (दि.13) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिफ्ट अडकल्याने एकच गोंधळ उडाला होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक लिफ्ट अडकल्याने लोकांचा एकच गोंधळ उडाला. ही लिफ्ट अडकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात लोक अडकले होते. सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान तब्बल दोन तासांनी त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान काल विद्यार्थांची फजिती झाल्याचे पहायला मिळाली. ठाण्यातील सिघांनिया शाळेत लिफ्टमध्ये मुले अडकल्याने मुलांचा गोंधळ उडाला होता. दरम्यान काही नागरिकांनी मिळून लगेच लिफ्ट सुरू करत अडकलेल्या मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे. याचबरोबर मागच्या दोन दिवसांपूर्वी माजी आमदारांच्या हॉटेलमध्ये लिफ्ट अडकल्याने मोठा गोंधळ उडाला होता.  

हे ही वाचा :  लेट नाईट फिरणाऱ्या कपलला लावला दंड; एका ट्विटने प्रकरण पोलिसांवरच उलटलं

संबंधित बातम्या

या हॉटेलच्या लिफ्टमध्ये बरेच ग्राहक अडकल्याने लोकांनी मोठी आरडा ओरड केली होती. दरम्यान काही वेळाने लिफ्ट सुरू करण्यात आली.

भाजपच्या माजी आमदाराच्या हॉटेलच्या लिफ्टध्ये अडकलेल्या ८ जणांना तब्बल अडीज तासांनी बाहेर काढण्यात आले. एरव्ही लिफ्ट मध्ये लोक अडकल्यास अग्निशमन दल लिफ्टचे भाग कापून आधी लोकांची सुटका करण्यास प्राधान्य देते . परंतु ह्यावेळी मात्र लिफ्ट उघडण्याची वाट तब्बल अडीज तास पाहण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  अनोळखी नंबरवरून सतत मिस्ड कॉल व्हा सावध; एकाला लाखो रुपयांना फसवलं

फाउंटन नाका वरसावे येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. त्या ठिकाणी खाजगी कार्यक्रम साठी लोक आले आहेत . हॉटेलच्या लिफ्टची क्षमता ४ माणसांची असल्याचे लिहलेले असताना त्यात तब्ब्ल ८ जण गेले. वजनामुळे लिफ्ट तळ आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान बंद पडली. ही घटना साधारण साडे तीन ते चारच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या