JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING: प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी केली आत्महत्या

BREAKING: प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी केली आत्महत्या

सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला.

जाहिरात

या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की, सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. पण तो डिप्रेशनमध्ये होता आणि हेच त्याच्या आत्महत्येचं कारण ठरलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (bollywoord actor Sushant Singh Rajput) यांनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘काय पो छे!’ या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतवर मानसोपचार सुरू होते. तो नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याच्या घरातून मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यानुसार डिप्रेशनवर तो उपचार घेत होता. सर्वात धक्कादायक म्हणजे, सुशांतच्या घरात त्याचे मित्र आलेले होते. त्याच वेळी त्याने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं. सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अगदी एकच आठवड्यापूर्वी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या बातमीनंतर सुशांतने Tweet करून भावना व्यक्त केल्या होत्या. ‘दिशाची बातमी हादरवून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन’, असं त्यानं लिहिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या