मुंबई, 10 नोव्हेंबर: आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees are told to get out from rest room at Nalasopara depot) विश्रांतीगृहातून बाहेर काढून टाळं ठोकण्यात येत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आगाराबाहेर (ST wokers agitation outside ST depot) आपापल्या पेट्यांसह आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मुंबईतील नालासोपारा आगारात हा प्रकार घडला. एसटी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन मागे घेत नसल्याचं दिसल्यावर सरकारनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. त्यानुसार नालासोपारा एस.टी. स्टँडवरी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठीच्या विश्रांती गृहाला टाळे ठोकण्यात येत असून तिथं मुक्कामी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
कर्मचारी मागण्यांवर ठाम प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी मागण्यांवरून मागे हटणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आपापल्या पेट्या सांभाळत त्यांनी आगाराबाहेर आंदोलन सुरू ठेवलं आहे. अनेक एसटी कर्मचारी हे बाहेर गावाहून नालासोपाऱ्यात आले आहेत. परत जाण्यापूर्वीच आंदोलन तीव्र झाल्यामुळे ते या जागी अडकून पडले आहेत. मात्र अशा कर्मचाऱ्यांना आता विश्रामगृहातून बाहेर काढलं जात असून सुरक्षा रक्षकांकडून टाळं ठोकण्यात येत आहे. यामुळे आंदोलन संपेपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दबावाला बळी न पडण्याचा इशारा महामंडळाकडून एकीकडे सबुरीची भाषा आणि दुसरीकडे कारवाई अशी भूमिका घेतली जात असल्याबद्दल कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत. मात्र काहीही झालं तरी मागण्या मान्य केल्याशिवाय संपातून माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर संपकरी एसटी कर्मचारी ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. सर्व कर्मचारी आपलेच असून कोरोना काळातून राज्य सावरत असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभिर्यानं विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.