JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / समुद्र खवळलेला असताना तुफानी करायला गेले अन्...जुहू बीचवर मोठी दुर्घटना

समुद्र खवळलेला असताना तुफानी करायला गेले अन्...जुहू बीचवर मोठी दुर्घटना

मुंबईच्या जुहू बीचवर मोठी दुर्घटना घडली आहे

जाहिरात

जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : मुंबईच्या जुहू बीचवर मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेले 6 जण समुद्रामध्ये बुडाले आहेत. यातल्या दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर अजून 4 जण बेपत्ता आहेत. बिपरजॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आलं आहे. मालवण समुद्रकिनारी देखील मोठ-मोठ्या लाटा उसळत असून 13 जून पर्यंत मालवण किनारपट्टी भागात 3.5 ते 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान काल गणपतीपुळ्याच्या समुद्रावरही समुद्राला उधाण आलं होतं. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले. यावेळी पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवले साहित्य वाहून गेले. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे. बिपरजॉय वादळ इतकं धोकादायक का झालं? अरबी समुद्रात लपलंय कारण बिपरजॉयया वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जातेय. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्यायत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या