मुंबई, 10 जुलै : शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) हे महाविकास आघाडी सरकार **(MVA Government)**मध्ये वनमंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण आता याच संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं. उदय सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं, संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार असं एक वक्तव्य एका मंत्र्याने केलं. खरं तर हे महत्वाचं आहे पाहण की स्टेटमेंट कुणी केलं आहे. त्यांची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासमोर येतीलच. संजय राठोडवर एका निष्पाप मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं पाप त्याच्या माथ्यावर आहे. त्यासाठी आमची न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे.
संजय राठोड इज बॅक? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान म्हणून मी नेहमी म्हटते हे सरकार बलात्काऱ्यांना आश्रय नाही तर राजाश्रय देण्याचं काम करत आहे. बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचीच यांची मानसिकता आहे. राज्यातील महिला, मुली यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत. रोज घटना वाढत आहेत. इतकेच नाही तर पोलीस दलात ज्या महिला काम करत आहेत त्यांच्यावरही बलात्कार होत आहेत. हे विकृत कोणाचा दाखला देत आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या. संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी प्रतिक्रिया ज्यांनी दिली आहे त्यांचीही पार्श्वभूमी एकदा तपासून त्यांच्या बद्दल सत्यता तपासता येईल. म्हणजे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल असे चित्रा वाघ म्हणाल्या.